Mumbai Port Trust Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. होणाऱ्या भरती मधून 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून ” सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक / सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक / डॉक क्लर्क ” या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडून सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 12 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या होणाऱ्या भरती मधून ऑफलाइन पत्राद्वारे आणि ऑनलाइन ई-मेल द्वारे इच्छुक असलेल्या उमेदवारांचा करू शकतात. मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 24 रिक्त जागांकरिता मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्याकरिता भरतीचे आयोजन केलेले आहे.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे होणाऱ्या भरती मधून ” सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक / सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक / डॉक क्लर्क ” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
Mumbai Port Trust Bharti 2024 | मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.
- सदरील Mumbai Port Trust Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. शैक्षणिक पात्रता अधिक विस्तृतपणे समजून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील Mumbai Port Trust Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई शहर असणार आहे.
- या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करू शकतात. यासंदर्भात अधिक माहिती जाहिरातीत देण्यात आलेली आहे.
- ” प्रशासकीय अधिकारी कार्यालय, बोर्ड लेबर, विभाग, तिसरा मजला आंबेडकर भवन इंदिरा डॉक मुंबई – 400001 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जमा करायचे आहेत.
- oblho@mumbaiport.gov.in या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक / सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक / डॉक क्लर्क या पदांसाठी एकूण 24 जागा रिक्त आहेत.
- Mumbai Port Trust Bharti 2024 या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 45,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सायंकाळी 5 वाजायच्या अगोदर 12 नोव्हेंबर 2024 या तारखेला आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचे आहेत.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांना एक वर्षाच्या कंत्राटी स्वरूपात कामावर घेण्यात येणार आहे.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला महिन्याला 45 हजार रुपये मिळतील त्याचप्रमाणे उमेदवाराला प्रवासी भत्ता दरमहा दहा हजार रुपये मिळेल. याच्या व्यतिरिक्त उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता मिळणार नाही.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला तीन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराला आठवड्यातून एकदा सुट्टी मिळणार आहे.
- वर्षामध्ये उमेदवाराला अवेलेबल असलेल्या सुट्ट्या मिळणार आहेत. त्यावेळेस त्याच्या जागेवर ती इतर कर्मचारी असणे गरजेचे आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना ऑफिस वर्क असणार आहे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या सूचनेनुसार त्यांना इतर काम सुद्धा करावे लागणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराचे कंत्राट कधीही रद्द करण्यात येऊ शकते. कंत्राट रद्द करण्याच्या अगोदर एक महिना उमेदवाराला कळविण्यात येईल. जर उमेदवाराला सदरील नोकरी सोडायची असेल तर अशा उमेदवारांनी एक महिना अगोदर नोटीस पिरियड मध्ये कंपनीला कळवणे गरजेचे आहे. जर पदावर नियुक्त केलेल्या उमेदवाराचे काम समाधानकारक नसेल तर आशा उमेदवाराची नोकरी संपुष्टात येऊ शकते. त्या उमेदवाराला 12 तासाच्या आत मध्ये टर्मिनेट करण्यात येईल.
- जर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा पदावर नियुक्त झाल्यानंतर काम करत असताना कसल्याही प्रकारचा अपघात झाला तर त्या संदर्भात संपूर्ण वैद्यकीय खर्च कंपनीकडून करण्यात येईल. इतर कोणताही वैद्यकीय खर्च उमेदवाराचा किंवा उमेदवाराच्या कुटुंबीयांचा संस्थे कडून करण्यात येणार नाही.
Mumbai Port Trust Bharti 2024 | मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे आहेत.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा ऑफलाईन जाहिरातीत देण्यात आलेला पत्त्यावर पत्राद्वारे अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीने उमेदवाराने अर्ज करू नयेत.
- ऑनलाइन वेबसाईट द्वारे किंवा ऑनलाइन लिंक द्वारे अर्ज करण्याची कोणतीही सुविधा उमेदवाराला देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी या दोन पद्धतीने अर्ज करू नयेत. अनोळखी लिंक द्वारे केव्हा प्रणाली द्वारे केल्यानंतर फसवणूक झाल्यास त्याला उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
- सदरील Mumbai Port Trust Bharti 2024 भरती करिता ऑनलाइन ई-मेल द्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती अर्जामध्ये भरायची नाही. अर्जामध्ये चुकीची माहिती भरणाऱ्या उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. याला पूर्णपणे उमेदवार जबाबदार असेल .
- 12 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर उमेदवाराला ऑफलाइन किंवा ऑनलाईन कोणत्याही पद्धतीने अर्ज करता येणार नाही. कारण या तारखेनंतर कोणाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कंपनीचे जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे जाहिरात वाचून समजल्या नंतरच उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
Mumbai Port Trust Bharti 2024 | मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवाराचा सदरील भरती करिता पात्र ठरणार आहेत. या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील Mumbai Port Trust Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या किंवा भरतीच्या प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या यापैकी कोणत्याही उमेदवाराला मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक नोंद घ्यावी.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरतीसाठी अर्ज करण्याचा फॉर्म अर्जाचा शेवटी देण्यात आलेला आहे. या अर्जाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सुरुवातीला उमेदवारांनी आपला फोटो चिकटवायचा आहे. सदरील भरती चा अर्ज हा सीनियर डेप्युटी ट्राफिक मॅनेजर यांना करायचा आहे. या अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. अर्जदार रिटायर होताना कोणत्या मुद्द्यावर होता त्यासंदर्भात माहिती लिहायची आहे. अर्जदाराने स्वतःची जन्मतारीख आणि वय लिहायचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी काम करत असताना किती पगार होता यासंदर्भात माहिती लिहायची आहे. उमेदवारांनी स्वतःचा रहिवासी पत्ता लिहायचा आहे. त्याचबरोबर स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर अर्जामध्ये नमूद करायचा आहे. अर्ज संपल्यावर अर्जाच्या खाली उजव्या कोपऱ्यामध्ये स्वतःची स्वाक्षरी करायची आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमित कामावर असणाऱ्या उमेदवाराप्रमाणे सोयी आणि सवलती मिळणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सदृढ असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे काम करण्याचे शारीरिक सामर्थ्य असणे गरजेचे आहे.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील Mumbai Port Trust Bharti 2024 भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती समजून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.