Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 | आदिवासी विकास विभाग अंतर्गत 10 वी / 12 वी / पदवी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

 Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 | आदिवासी विकास विभाग यांच्याकडून भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. रिक्त जागा भरण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदरील भरती मधून 611 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, गृहपाल, अधीक्षक, लिपिक, टंकलेखक व इतर पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची सुरुवात झालेली आहे. 2 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

  • आदिवासी विकास विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती मधून उमेदवारांना कायमस्वरूपी ची सरकारी नोकरी मिळणार आहे.
  • 611 रिक्त जागांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 मधून केली जाणार आहे.
  • आदिवासी विकास विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती मधून वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल- मुख्य लिपिक- सांख्यिकी सहाय्यक ( वरिष्ठ ), आदिवासी विकास निरीक्षक ( नॉनपेसा ), वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघु टंकलेखक, गृहपाल- स्त्री, गृहपाल पुरुष, अधिक्षक स्त्री, अधिक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरा मन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न लेखक या पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
  • सरकारी भरती संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

[ Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ] आदिवासी विकास विभाग येथील भरतीसाठी वयाची अट व शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

  • आदिवासी विकास विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येईल. तर SC / ST / महिला / अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी / 12 वी / पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली विस्तृतपणे देण्यात आलेली आहे.
  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शारीरिक शिक्षण शास्त्र यापैकी कोणत्याही शाखेची दुय्यम श्रेणीतील पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे.
  • संशोधन सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाची पदवी मिळवलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • उपलेखापाल- मुख्य लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. परंतु ज्या उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षण शास्त्रातील पदवी मिळवलेली आहे आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यता असलेल्या विद्यापीठातून पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. जर उमेदवार शिक्षणशास्त्रातील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेला असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी धारण केलेली असावी. परंतु सांख्यिकी शास्त्र, गणित, वाणिज्य , अर्थशास्त्र यापैकी कोणत्याही शाखेची पदवी मिळवलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • लघु टंकलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवाराचा लघु लेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रतिमिनिट असावा. मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असावा. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रतिमिनिट असावा.
  • अधिक्षक ( पुरुष ) / अधिक्षक ( स्त्री ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आदिवासी प्रशासन, आदिवासी कल्याण, समाज कल्याण प्रशासन, समाजकार्य या शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
  • गृहपाल ( पुरुष ) / गृहपाल ( स्त्री ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन, आदिवासी कल्याण, आदिवासी कल्याण प्रशासन या शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवणे आवश्यक आहे.
  • ग्रंथपाल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयातून ‘ग्रंथालय प्रशिक्षण’ पदाचे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे. परंतु ग्रंथालय शास्त्र मधील पदवी उत्तीर्ण उमेदवारांना आणि दोन वर्षापेक्षा जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. आणि मान्यताप्राप्त संस्थेमधून ग्रंथालय प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मिळवले आहे. आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • कॅमेरामन – कम- प्रोजेक्टर ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांची मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफीची पदविका किंवा प्रमाणपत्र आहे आणि शासनमान्य संस्थेमधील फोटोग्राफी, प्रिंटिंग एन लार्ज आणि त्याशी संबंधित शास्त्र केव्हा तंत्रज्ञान इत्यादी. तीन वर्षात किंवा त्यापेक्षा जास्त ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संविधीक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेला असावा. किंवा समतुल्य
  • उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेत कडून 10 वी / 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. शासन मान्यताप्राप्त असणारी 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट असावे. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट असावे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा MS-CIT कोर्स पूर्ण केलेला असावा. या पदासाठी उमेदवाराची व्यावसायिक परीक्षा घेण्यात येईल.
  • निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी / 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. 100 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी लघु लेखनाची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट असावे. मराठी शब्द टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट असावे. उमेदवारांनी MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सदरील पदासाठी उमेदवाराची चाचणी घेण्यात येईल.

[ Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ] आदिवासी विकास विभाग येथील भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे असेल.

  • सदरील भरती Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 मधील सर्व पदांसाठी कॉम्प्युटर द्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा बहुपर्यायी असणार आहे. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी सदरील परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी चाचणीमध्ये उमेदवाराने 45% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
  • कॉम्प्युटर द्वारे घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी चाचणी मध्ये प्रत्येक प्रश्नात करिता दोन गुण असणार आहेत.
  • कॉम्प्युटर वर आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाची होणार आहे. प्रत्येक विषयासाठी 50 गुण असणार आहेत. एकूण 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. सदरील परीक्षेसाठी कालावधी दोन तासांचा असेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क 200 रुपये असेल.
  • मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 900 रुपये असणार आहे.
  • एकदा परीक्षा फी जमा केल्यानंतर ती परत मिळणार नाही. परीक्षा फी ही नॉन रिफंडेबल असणार आहे.
  • अप्पर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेला पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराने स्वतः निवडलेल्या परीक्षा केंद्रावर बसून परीक्षा देणे अनिवार्य आहे.
  • सदरील भरतीसाठी Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 होणारी परीक्षा फक्त ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे.
  • 12 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.
  • उमेदवाराला एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करायचे असल्यास प्रत्येक पदासाठी सेपरेट अर्ज करावा. आणि प्रत्येक पदासाठी सेपरेट परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे.
  • 2 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य आहे.
  • सदरील भरती मधील पदसंख्या वाढवणे किंवा कमी करणे, परीक्षेचे ठिकाण किंवा तारीख बदलणे, परीक्षेचे स्वरूप बदलणे, परीक्षा स्थगित किंवा रद्द करणे याचा पूर्णपणे अधिकार आदिवासी विकास विभागाकडे राहील.
  • Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे ऑनलाइन अर्जाला जोडणे गरजेचे नाही. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरत असताना संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बरोबर आणि सत्य भरणे गरजेचे आहे. अर्ज भरत असताना कोणतीही माहिती चुकीची भरू नये. असे आढळल्यास उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर बाद केला जाईल. त्यास पूर्णपणे उमेदवार जबाबदार असेल.
  • ऑनलाइन परीक्षा देत असताना परीक्षा केंद्रावर मोबाईल, कॅल्क्युलेटर, आयपॅड किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी वापरण्यास सक्त मनाई आहे. असे आढळून आल्यास त्या उमेदवारावर काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज भरलेल्या उमेदवाराचे प्रवेश पत्र उमेदवाराला ऑनलाईन वेबसाईट वरती मिळेल. हे प्रवेशपत्र उमेदवारांनी स्वतः डाऊनलोड करावे. इतर कोणत्याही मार्गाने उमेदवाराला प्रवेश पत्र पाठवण्यात येणार नाही.
  • पात्र उमेदवारांची यादी ऑनलाइन वेबसाईट वरती देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी वारंवार वेबसाईट चेक करणे गरजेचे आहे.

[ Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ] आदिवासी विकास विभाग येथील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मागील तीन महिन्यात काढण्यात आलेला पासपोर्ट साईज फोटो. ( 4.5 cm X 3.5 cm )
  • अर्जदाराची स्वाक्षरी ( काळ्या शाईमध्ये असावे )
  • अर्जदाराचा पांढऱ्या कागदावरील डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा निळ्या किंवा काळा रंगामध्ये.
  • उमेदवाराचे स्वतःच्या अक्षरात लिहिलेले घोषणापत्र.
  • उमेदवाराने स्वतःची स्वाक्षरी इंग्रजी कॅपिटल लेटर मध्ये करू नये. अशी स्वाक्षरी स्वीकारण्यात येणार नाही.
  • उमेदवाराचा अंगठ्याचा ठसा व्यवस्थित दिसावा. त्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नसावा.
  • आदिवासी विकास विभाग Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

Leave a Comment