Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय येथे 49 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Bombay High Court Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 49 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून ‘ संसाधन कर्मचारी ‘ या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 5 नोव्हेंबर 2024 ही सदरची भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे किंवा ऑनलाईन द्वारे अर्ज करायचे आहेत. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता मुंबई उच्च न्यायालय कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 49 रिक्त जागांकरिता योग्य उमेदवारांची निवड मुंबई उच्च न्यायालय यांच्या द्वारे करण्यात येणार आहे.

     

  • ‘ संसाधन कर्मचारी ‘ या पदाकरिता योग्य उमेदवार मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून निवडण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे भरती.

 

Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024

Bambay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • सदरील Bombay High Court Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार मुंबई उच्च न्यायालय येथून रिटायर झालेले अधिकारी केव्हा रिटायर झालेले कर्मचारी ( गट- अ ते क ) हे भरतीसाठी पात्र असणार आहेत. जे उमेदवार मुंबई उच्च न्यायालय येथून कंपल्सरी रिटायर झालेले आहेत किंवा प्रोटेक्शन पिरियड मध्ये रिटायर झालेले आहेत आशा उमेदवारांना चौधरी भरती करिता अर्ज करता येणार नाही.

     

  • जुनी झालेली कागदपत्रे डिजिटल स्वरूपामध्ये तयार करून सेव्ह करण्याकरिता. आणि इतर कागदपत्रे आणि फायली सिक्वेन्स नुसार लावण्याकरिता सदरील उमेदवारांची गरज असणार आहे. दिलेल्या इंडेक्स प्रमाणे उमेदवारांनी फाइलच्या अरेंजमेंट करायची आहे. जे उमेदवार सदरील कागदपत्रांचे स्कॅनिंग करत आहेत आशा उमेदवारांना क्रमानुसार फाईल देण्याचे काम उमेदवाराला करावे लागणार आहे.

     

  • सदरील Bombay High Court Bharti 2024 भरती करिता पदावर नियुक्त करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. हे अर्ज उमेदवारांनी नोटीस पिरियड दरम्यान भरायचे आहेत. यातून निवड यादी जाहीर नोटीस द्वारे किंवा उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवड यादीत नाव आलेल्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी यावे लागणार आहे. दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या तारखेला उमेदवारांनी उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी मुलाखतीसाठी यायचे आहे.

     

  • सदरील Bombay High Court Bharti 2024 भरतीसाठी योग्य उमेदवाराची निवड मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे. सिलेक्ट केलेल्या उमेदवारांना एप्रिल साठी चीफ जस्टिस यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.

     

  • सदरील Bombay High Court Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता दरमहा 31,064 रुपये वेतन देण्यात येणार आहे. त्यामध्ये उमेदवारांना टॅक्स द्यावा लागणार आहे. टंटा टॅक्स कट होणार आहे.

     

  • सदरील Bombay High Court Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त केलेल्या उमेदवारांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणत्याही सरकारी सोयीसुविधा मिळणार नाहीत. उमेदवारांची निवड कंत्राटी स्वरूपाची असणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

     

  • Bombay High Court Bharti 2024 या भरती करिता अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन / ऑनलाइन ( ई-मेल द्वारे ) अर्ज करू शकतात.

     

  • rgestt-bhc@nic.in या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.

     

  • ” रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजूला, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाउंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – ४००००१” भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या पत्त्यावर आपले अर्ज समक्ष सादर करायचे आहेत किंवा पत्राद्वारे पाठवायचे आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पद्धती व्यतिरिक्त इच्छुक उमेदवारांनी इतर कोणत्याही मार्गाने सदरील भरती करिता अर्ज करायचे नाहीत.

     

  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरती करिता न्यायालयाकडून कोणत्याही ऑनलाइन पद्धतीचा मार्ग देण्यात आलेला नाही. त्यामुळे इतर कोणत्याही उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे नाहीत. अर्ज करायचा पाचव्या वेबसाईट द्वारे कोणीही अर्ज करू नये त्यामुळे फसवणूक होऊ शकते.

     

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जामध्ये कसल्याही प्रकारची खडाखोड करू नये. किंवा अर्ज अपूर्ण भरू नये. उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःच्या नावाने संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे. चुकीची माहिती भरणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

     

  • 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर मिळालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

     

  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करत असताना काळजीपूर्वक अर्ज करायचे आहेत. जर उमेदवाराला या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आशा उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि जाहिरात समजून घेऊन अर्ज करायला सुरुवात करायचे आहे.

Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • सध्याची Bombay High Court Bharti 2024 भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जर अर्ज करायच्या अंतिम दिनांक पूर्वी दिलेल्या ठिकाणी अर्ध पोचवले असतील तरच पुढील भरतीच्या प्रक्रिया करिता उमेदवार पात्र ठरणार आहेत. अर्ज न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही.

     

  • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या किंवा मुंबई उच्च न्यायालय यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून कसलाही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यावी.

     

  • सदरील Bombay High Court Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये जर कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार घडण्यात आला तर अशा उमेदवारावर मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आशा उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाईल.

     

  • मुंबई उच्च न्यायालय यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उत्सुक असलेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे तुम्हाला सदरील न्यायालया बद्दल संपूर्ण माहिती अधिक विस्तृतपणे मिळणार आहे.

Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

  • भारत देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित न्यायालयाने पैकी महत्त्वाचे न्यायालय म्हणजे मुंबई उच्च न्यायालय हे आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात अंतिम असलेले न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय हे आहे. महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर गोवा दादर आणि नगर हवेली या इतर राज्यांमध्ये सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचा कारभार पसरलेला आहे. दक्षिण मुंबई मधील असणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे फोर्ट भागामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे. 14 ऑगस्ट 18 62 रोजी या न्यायालयाची स्थापना झालेली आहे. सदरील न्यायालयाची स्थापना ब्रिटिश कालखंडामध्ये झालेली आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयालाच बॉम्बे हायकोर्टाचे सुद्धा म्हटले जाते. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत पूर्णपणे जुनी आणि आकर्षक स्वरूपाची आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर औरंगाबाद आणि गोवा अशी तीन खंडपीठे आहेत. गोवा खंडपीठे गोव्यातील न्यायव्यवस्था करिता सहाय्य देण्याचे काम करते.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्या संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment