Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथे नोकरीचे सुवर्णसंधी.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई महानगरपालिका येथे निघालेल्या भारतीय संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून मुंबई महानगरपालिकेत द्वारे 178 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदरील भरती मधून ‘ निरीक्षक गट- क ‘ या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 ऑक्टोबर 2024 आहे. भरतीसाठी ज्या उमेदवारांना कसा करायचा आहे अशा उमेदवारांनी दिलेल्या ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करायचा आहे. सदरची भरती बाबत जाणून घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती कधीचा उमेदवार खालील देण्यात आलेला लेख वाचू शकतात.

  • 178 रिक्त जागा भरण्याकरिता मुंबई महानगरपालिका यांच्या कडून भरतीचे आयोजन केलेले आहे.
  • मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून ‘ निरीक्षक गट- क ‘ या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

MSIDC इथे नोकरीची सुवर्णसंधी.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • मुंबई महानगरपालिका येथील Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 10 वी परीक्षा मध्ये मराठी विषय 100 गुणांचा असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा लिहिता वाचता आणि बोलता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर उमेदवाराचे मराठी आणि इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असावेत.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवारांना बहुपर्यायी  परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र मुंबई शहर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी परीक्षा केंद्र असेल.
  • 19 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला सदरील भरती करिता अर्ज करता येणार नाही.
  • या Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरतीमुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 29,200 ते 92,300 रुपये वेतन मिळणार आहे.
  • मुंबई महानगरपालिका येथील सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचा कालावधी तीन वर्षांकरिता असेल. तीन वर्षानंतर उमेदवारांची सेवा बघून कालावधी कमी किंवा जास्त करण्यात येईल.
  • मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे सदरील भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता वेबसाईट देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सदरील वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचायचे आहेत.

  • सदरील Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरती करिता इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे अर्ज करायचा आहे.
  • मुंबई महानगरपालिका यांनी सदरील भरती करिता अर्ज करण्याची कोणत्याही प्रकारची ऑफलाइन सुविधा दिलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी महानगरपालिकेच्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच पत्राद्वारे अर्ज पाठवू नयेत.
  • मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज भरत असताना कोणत्याही उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना त्यामध्ये चुकीची माहिती किंवा फसवी माहिती देऊन मुंबई महानगरपालिकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. असे करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 ऑक्टोबर 2024 आहे.
  • मुंबई महानगरपालिका यांच्या संदर्भात किंवा सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात वाचावी त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट झाली.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • मुंबई महानगरपालिका येथील Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. असे उमेदवारच भरतीसाठी पात्र असू शकतात. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले नाहीत अशा कोणत्याही उमेदवाराला थेट परीक्षा करिता प्रवेश मिळणार नाही.
  • सदरील Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराला मुंबई महानगरपालिका यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवारांनी दबाव तंत्राचा उपयोग करू नये. असे करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्या उमेदवाराला इथून पुढे मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही भरतीमध्ये अर्ज करता येणार नाही.
  • सदरील होणाऱ्या Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरतीमध्ये जर उमेदवाराला सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर अशा उमेदवारांनी योग्य ती प्रमाणपत्र महानगरपालिकेत पुढे सादर करणे गरजेचे आहे.
  • मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या भरती मधून पदावर नियुक्त झाल्यानंतर कोणत्याही उमेदवारांनी कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये. अनुचित प्रकार करताना कोणताही उमेदवार आढळला तर त्या उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • सदरील Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरती मधील होणारी ‘ निरीक्षक ‘ पदांची निवड फक्त कंत्राटी पद्धतीने होणार आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी वापरलेला ई-मेल आयडी चालू असावा. भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी त्या ईमेल आयडी वरती मुंबई महानगरपालिका कडून देण्यात आलेल्या सूचना ईमेल आयडी वरती जाऊन चेक करून समजून घ्यायचे आहेत.
  • निरीक्षक या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता वेतन श्रेणी ‘ स्तर – M17 – 29,200 – 92,300 ‘ ही असणार आहे.
  • या भरती मधून उमेदवारांची निवड सरळ सेवेमार्फत होणार आहे.
  • सदरील भरती मधील एकूण 178 रिक्त जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गा करिता 11 जागा आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गा करिता 3 जागा रिक्त आहेत. विमुक्त जाती ( अ ) या प्रवर्गात एकूण तीन जागा रिक्त आहेत. भटक्या जमाती ( ब ) या प्रवर्गातील 4 जागाआहेत. भटक्या जमाती ( क ) या प्रवर्गातील एकूण 2 जागा आहेत. भटक्या जमाती ( ड ) या प्रवर्गातील 0 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 0 जागा देण्यात आलेला आहे. इतर मागास प्रवर्गासाठी 32 जागा आहेत. सा.शै.मा.व. या प्रवर्गात एकूण 18 जागा आहेत. आ.द.ु घ. या प्रवर्गासाठी 18 रिक्त जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 87 जागा देण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी स्वतःच्या प्रवर्गातील जागा पाहूनच भरतीसाठी अर्ज करावा. ज्या प्रवर्गातील उमेदवारांना जागा देण्यात आलेली नाहीत. आशा प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज करावा.
  • सदरील Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना समांतर आरक्षण देण्यात आलेले आहे. या समांतर आरक्षणामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 60 जागा रिक्त आहेत. महिला प्रवर्गासाठी 53 जागा आहेत. माजी सैनिक या प्रवर्गासाठी एकूण 27 जागा रिक्त आहेत. प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता एकूण नऊ जागा रिक्त आहेत. भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी एकूण तीन जागा रिक्त आहेत. खेळाडू उमेदवारांकरिता एकूण नऊ जागा रिक्त आहेत. अंशकालीन पदवीधर म्हणजेच सुशिक्षित बेरोजगार यांच्याकरिता एकूण 17 रिक्त आहेत. समांतर आरक्षणाचा फायदा घेण्याकरिता उमेदवाराकडे संबंधित जगातील शासकीय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • सदरील भरती मधून अनाथ मुलांकरिता दोन जागा देण्यात आलेले आहेत. तर याच भरतीमध्ये दिव्यांग उमेदवारांकरिता सात पदे देण्यात आलेले आहेत.
  • सदरील Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.
  • मुंबई महानगरपालिका येथील निरीक्षक पदाकरिता देण्यात आलेली वरील माहिती अपूर्ण असू शकते. माहिती अधिक विस्तृतपणे समजून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment