NIV Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे निघालेल्या भरती संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 31 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ शिकाऊ उमेदवार’ या पदासाठी सदरील भरती मधून योग्य उमेदवार निवडण्यात येणार आहेत. 30 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. सदैव भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्याद्वारे देण्यात आलेली जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता खालील देण्यात आलेला लेख वाचवा.
- 31 जागा भरण्याकरिता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- ‘ शिकाऊ उमेदवार ‘ या पदासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी , पुणे यांच्याकडून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री लिमिटेड येथे भरती.
NIV Pune Bharti 2024 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.
- सदरील NIV Pune Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेकॅनिक ( फ्रिज आणि एसी ), प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, कारपेंटर, मेकॅनिक ( मोटर वेहिकल ), इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मॅनेजमेंट या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
- इलेक्ट्रिशियन पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 9,770 रुपये वेतन मिळणार आहे. प्लंबर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 8685 रुपये वेतन मिळणार आहे. मेकॅनिक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 9,770 रुपये वेतन मिळणार आहे. प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 8,685 रुपये वेतन मिळणार आहे. कार्पेंटर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रतिमहा 8685 रुपये वेतन मिळणार आहे. मेकॅनिक ( मोटार वेहिकल ) या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 9,770 रुपये वेतन मिळणार आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मॅनेजमेंट या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 9,770 रुपये वेतन मिळणार आहे.
- इलेक्ट्रिशन या पदासाठी एकूण आठ जागा आहेत. प्लंबर या पदासाठी एकूण दोन जागा आहेत. मेकॅनिक ( फ्रिज आणि एसी ) या पदाकरिता एकूण दोन जागा रिक्त आहेत. प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट या पदाकरिता एकूण 13 जागा रिक्त आहेत. कार्पेंटर या पदाकरिता एकूण दोन जागा रिक्त आहेत. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मॅनेजमेंट या पदासाठी एकूण दोन जागा रिक्त आहेत.
- सदरील NIV Pune Bharti 2024 भरती मधून फक्त फ्रेश ITI पास झालेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी कोणत्याही अप्रेंटिस कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला नव्हता. आशा उमेदवारांना सदरील प्रशिक्षणामध्ये संधी मिळणार आहे.
- सदरील भरती मधून अप्रेंटिस पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही नोकरीची हमी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्याकडून देण्यात येत नाही. सदरील प्रशिक्षणाचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला प्रमाणपत्र देण्यात येईल.
- उमेदवारांनी देण्यात आलेला एप्लीकेशन फॉर्म भरून त्यावर त्यावर स्वतःचा आयडेंटिफाय फोटो चिकटवायचा आहे. त्यानंतर सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदरील अर्ज apprenticehipniv@gmail.com या ईमेल आयडी वरती 30 ऑक्टोबर 2024 पूर्वी पाठवायचा आहे. कोणत्याही उमेदवारांनी सदरील फॉर्मची आणि डॉक्युमेंट चे हार्ड कॉपी संस्थेच्या पत्त्यावर पाठवायचे नाही.
- सदरील NIV Pune Bharti 2024 भरती मधून निवड केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. उमेदवारांना मुलाखतीची तारीख रजिस्टर केलेल्या ईमेल आयडी द्वारे कळवण्यात येईल. मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांनी कागदपत्रे, फोटो आयडी कार्ड आणि त्यांच्या सत्यप्रती सोबत घेऊन यायचे आहेत. उमेदवारांनी येताना दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणायचे आहेत. उमेदवारांनी मुलाखतीला स्वखर्चाने घ्यायचे आहे.
- सदरील NIV Pune Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही प्रकारचा दबाव तंत्राचा उपयोग करणाऱ्या उमेदवाराचा रजा रद्द करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारा करिता नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्याकडून सदरील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी जाहिरात पहा.
NIV Pune Bharti 2024 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा ईमेल आयडी जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा सध्या तरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी संस्थेच्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे नाहीत.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या शेवट दिलेला अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. अर्ज भरत असताना खडाखोड करू नये. किंवा अर्ज अपूर्ण भरू नये किंवा अर्जामध्ये चुकीची माहिती लिहू नये असे आढळल्यास उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- 30 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. अर्ज करण्याची ही अंतिम दिनांक आहे.
- सदरील NIV Pune Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात काळजीपूर्वक वाचण्यासाठी उमेदवारांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचावी.
NIV Pune Bharti 2024 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत असे उमेदवारात सदरील भरतीसाठी पात्र असणार आहेत.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
NIV Pune Bharti 2024 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलेला फॉर्म भरायचा आहे.
- अर्ज भरत असताना उमेदवारांनी अर्जाच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात सध्याचा पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे. पहिल्या क्रमांकावर उमेदवाराने ज्या ट्रेड साठी अर्ज करायचा आहे त्या ट्रेड चे नाव लिहायचे आहे. दुसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव आडनाव प्रथम मध्ये नाव आणि शेवटी वडिलांचे किंवा नवऱ्याचे नाव लिहायचे आहे. तिसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी संपूर्ण नाव मराठी भाषेमध्ये लिहायचे आहे. चौथ्या क्रमांकावर उमेदवारांनी आईचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहायचे आहे. पाचव्या क्रमांकावर उमेदवारांनी ज्या ठिकाणी सध्या राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता लिहायचा आहे. उमेदवारांनी सध्याचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिहायचा आहे. सहाव्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचा परमनंट ऍड्रेस लिहायचा आहे. सातव्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःची जन्मतारीख आणि वय लिहायचे आहे. आठव्या क्रमांकावर उमेदवारांनी SC / ST /OBC / GEN. यापैकी कोणत्या प्रवर्गात आहे त्या प्रवर्गाचे नाव आणि जातीचे नाव लिहायचे आहे. नवव्या क्रमांकावर उमेदवारांनी जर अपंग असेल तर त्या संदर्भातील माहिती लिहायची आहे. दहाव्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचा वैवाहिक स्टेटस लिहायचा आहे. अकराव्या क्रमांकावर उमेदवारांनी उत्तीर्ण केलेल्या परीक्षा संदर्भात तपशील द्यायचा आहे. 12 व्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःच्या कामाचा अनुभव लिहायचा आहे. 13 व्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नंबर लिहायचा आहे. 14 व्या क्रमांकावर ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहे त्या पोस्टचे नाव लिहायचे आहे. 15 व्या क्रमांकावर जर उमेदवार यापूर्वी गव्हर्मेंट सर्विस मध्ये काम करत असला तर त्याबद्दल माहिती लिहायची आहे. त्यानंतर उमेदवारांनी सेल्फ डिक्लेरेशन देऊन स्वतःची सही करायची आहे.