Patbandhare Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार पाटबंधारे खात्यामध्ये भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पाटबंधारे विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी 14 ऑक्टोंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मधून ‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करायची आहे. अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचवायचे आहेत. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी पाटबंधारे मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. पाटबंधारे विभागातील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- 12 जागा पाटबंधारे विभागाकडून सदरील भरती द्वारे भरण्यात येणार आहेत.
- पाटबंधारे विभागाकडून ‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) ‘ या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरती
Patbandhare Vibhag Bharti 2024 | पाटबंधारे विभाग येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी खालील प्रमाणे.
- सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, अधिकारी यापैकी कोणत्याही पदावरून जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल.
- सदरील Patbandhare Vibhag Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य शाखेतून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराला करार पद्धतीने कनिष्ठ अभियंता पदासाठी काम केलेला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे
- कनिष्ठ अभियंता या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- Patbandhare Vibhag Bharti 2024 सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण कोल्हापुर असणार आहे.
- या भरती करिता अर्ज करणारा उमेदवार शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आणि आरोग्यदृष्ट्या सदृढ असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सदरील पदावर नोकरी करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.
- सदरील Patbandhare Vibhag Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारावर विभागीय चौकशी, न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे नसावीत. यासंदर्भात उमेदवाराने यापूर्वी ज्या कार्यालयात काम केलेले आहे अशा कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र उमेदवाराने घेतलेले असणे आवश्यक आहे.
- पदावर नियुक्त होण्यापूर्वी उमेदवाराने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती करार करणे आवश्यक असेल. त्यामध्ये प्रामुख्याने उमेदवाराला शासन सेवेत नियमित रुजू असलेल्या इतर उमेदवारांना प्रमाणे कोणत्याही सुविधा व हक्क मिळणार नाहीत. असे अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून लिहून घेतले जाईल.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला करारावर नमूद असलेले कार्यालय हेच त्याच्यासाठी मुख्य कार्यालय असेल. त्या कार्यालयातच त्याचे कार्यक्षेत्र असेल. जर कधी कामानिमित्त द्वाराला इतर ठिकाणी दौरा करावा लागला. तर त्या दौऱ्याचा खर्च म्हणजेच प्रवासी खर्च त्या उमेदवाराला देण्यात येईल.
- सदरील Patbandhare Vibhag Bharti 2024 भरती मधून उमेदवाराची करारावर नेमणूक करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारावर जे काम सोपवलेले आहे. ते काम त्या उमेदवाराला दिलेल्या वेळेत पूर्ण करणे बंधनकारक राहील. त्याला काम सोपवलेल्या अधिकारी उमेदवाराच्या कामाचे मूल्यमापन करण्याकरिता वेळोवेळी आढावा घेत राहील.
- सदरील भरती मधून सर्व प्रक्रिया पूर्ण करून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना कार्यालयामध्ये 15 दिवसाच्या आत मध्ये कामावर रुजू व्हायचे आहे. जर उमेदवार 15 दिवसाच्या आत कामावर रुजू झाला नाही तर त्याचे पद दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येईल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचा कालावधी एक वर्षाचा राहील. एक वर्षानंतर उमेदवाराची आवश्यकता असल्यास नोकरीचा कालावधी पुन्हा एक वर्षासाठी वाढवला जाईल. याचा पूर्णपणे निर्णय नियुक्ती अधिकारी घेतील.
- पाटबंधारे विभागातील भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ‘ कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक 2, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003’ या पत्त्यावर भरती करिता उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज पाठवायचे आहेत.
- पाटबंधारे विभाग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
Patbandhare Vibhag Bharti 2024 | पाटबंधारे विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- पाटबंधारे विभाग येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- पाटबंधारे विभाग यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली राबवण्यात आलेली नाही.
- पाटबंधारे विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार सेवानिवृत्त कर्मचारी असावा. इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी सदरील भरतीसाठी अर्ज करू नये. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती बरोबर घ्यावी. अर्जामध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- पाटबंधारे विभाग येथील भरतीसाठी 14 ऑक्टोंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- पाटबंधारे विभाग यांच्याकडून जाहीर केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. त्यामधून सदरील भरती संदर्भात सविस्तर माहिती उमेदवाराला समजेल. आणि त्यानंतरच अर्ज करावा.
Patbandhare Vibhag Bharti 2024 | पाटबंधारे विभाग येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्यांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- Patbandhare Vibhag Bharti 2024 सदरील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहे आशा उमेदवारांनाच पाटबंधारे विभागाच्या त्यावर काम करता येईल.
- कोणत्याही सेवानिवृत्त उमेदवाराला सदरील भरती करिता TA / DA देण्यात येणार नाही.
- या भरती मधील अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की कोणीही पदावर नियुक्त होण्यासाठी अनुचित प्रकार करू नये. असे आढळल्यास च्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- सदरील भरती ची जाहिरात ही फक्त कोल्हापूर विभागासाठी आहे. त्यामुळे उमेदवाराला नोकरी ही कोल्हापूर कार्यालयात मिळणार आहे.
- पाटबंधारे विभागाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी.
Patbandhare Vibhag Bharti 2024 | पाटबंधारे विभागातील सदरील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- अधीक्षक अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर यांच्याकडून सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- Patbandhare Vibhag Bharti 2024 सदरील भरती बद्दल अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही शंका असल्यास उमेदवारांनी (02131 ) 2651260, 2653182 या मोबाईल नंबर वरती संपर्क साधायचा आहे.
- वरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना जाहिराती मध्ये काही शंका आढळल्यास klpsekickop@gmail.com या ईमेल आयडी वरती संपर्क साधायचा आहे.
- सेवा करार पद्धती द्वारे सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना कामावर घेण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- या उमेदवारांचा उपयोग कोल्हापूर / सांगली विभागातील क्षेत्रस्तरीय सिंचन व्यवस्थापन व बांधकामाधीन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याकरिता होणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 14 ऑक्टोंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले अर्ज संबंधित पत्त्यावर पोहोचवायचे आहेत.
- सदरील भरती ही करार पद्धतीनुसार होणार आहे. या पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 64 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ‘ कनिष्ठ अभियंता ‘ या पदावर काम केलेल्या कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा.
- सदरील भरती मधील उमेदवाराला प्रस्तुत काम वेळेत पूर्ण करावे लागेल. त्यामुळे त्याच्याकडे सदरील काम करण्याची शारीरिक क्षमता असावी.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारा कोणत्याही न्यायालयामध्ये फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
- नियमित स्वरूपी शासकीय कामावर असणाऱ्या उमेदवारांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती कंत्राटी स्वरूपाच्या कामगारांना मिळणार नाहीत. याबाबतचे हमीपत्र उमेदवारांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देणे आवश्यक आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा जास्तीत जास्त 40,000 रुपये वेतन मिळेल.
- करार पद्धतीने नियुक्त झालेल्या उमेदवारांची कोणत्याही वेळेस सेवा समाप्त करण्याचा अधिकार अधीक्षक अभियंता यांच्याकडे राहील.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला काम करत असताना कोणताही आजार उद्भवला किंवा त्या व्यक्तीचा अपघात झाला तर त्याला शासन जबाबदार राहणार नाही.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला त्याची कामे ठरवून दिली जातील. त्यानंतर ती सर्व कामे करण्याची जबाबदारी नियुक्त झालेल्या उमेदवारांची असेल. याबाबत त्या उमेदवाराकडून हमीपत्र लिहून घेण्यात येईल.
- जे उमेदवार सप्टेंबर 2024 नंतर निवृत्त होणार आहेत. असे उमेदवार सुद्धा सदरील भरती करिता अर्ज करू शकतात. त्या उमेदवारांची दखल त्यांच्या निवृत्ती कालावधीनंतर घेण्यात येईल.
- भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार इतर कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा ज्यामुळे त्याला सोपवण्यात येणारी कामे करण्यास व्यत्यय येईल.
- पदावर नियुक्त झालेल्या सेवानिवृत्त उमेदवाराला जी कामे सोपवण्यात येतील त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि इतर दस्तावेज याबाबत उमेदवाराने गोपनीयता बाळगणे आवश्यक आहे.
- अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखती बद्दल माहिती त्यांच्या वैयक्तिक ईमेल आयडी वरती आणि मोबाईल वरती देण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे.
- वरील दिलेल्या सर्व अटी उमेदवाराला मान्य आहेत याबाबतचे हमीपत्र उमेदवाराला ₹ 100 च्या स्टॅम्प वरती करावे लागणार आहे.
Patbandhare Vibhag Bharti 2024 | पाटबंधारे विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील महत्त्वाच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- 4 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून सदरील भरती करिता अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 14 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 14 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- पाटबंधारे विभागातील भरती संदर्भात वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील Patbandhare Vibhag Bharti 2024 भरती करिता उमेदवार पत्राद्वारे किंवा थेट पत्त्यावर उपस्थित राहून आपले अर्ज सादर करू शकतात.
- या भरती करिता फक्त सेवानिवृत्त उमेदवारच अर्ज करू शकतात. नवीन पास होणाऱ्या उमेदवारांसाठी सदरील भरती नाही.
- या भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने कसल्याही प्रकारचा वशिला लावू नये. असे केल्यास त्या उमेदवाराला निवड प्रक्रियेतून वगळण्यात येईल.