Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण समाज कल्याण विभाग, पुणे येथे निघालेल्या 219 जागांच्या भरतीबाबत माहिती जाणून घेणार आहोत. समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 जागांची भरती निघालेली आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची 11 नोव्हेंबर 2024 ही अंतिम दिनांक आहे. ” वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल ( महिला ), गृहपाल ( सर्वसाधारण ), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक ” पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड समाज कल्याण विभाग पुणे यांच्याकडून करण्यात येणार आहे. या पदांकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- 219 जागा समाज कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून भरण्यात येणार आहेत.
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल ( महिला ), गृहपाल ( सर्वसाधारण ), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदासाठी योग्य उमेदवार सदरील भरती मधून निवडले जाणार आहेत.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे ( शारीरिक शिक्षण विषयातील पदवी असल्यास उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल ) त्याचबरोबर उमेदवाराकडे शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- गृहपाल ( महिला ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे ( शारीरिक शिक्षण विषयामध्ये पदवी मिळवलेली असेल तर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल) त्याचबरोबर उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT कोर्स उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- गृहपाल ( सर्वसाधारण ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी. ( शारीरिक शिक्षण या विषयामध्ये पदवी मिळवलेली असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ) त्याचबरोबर उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT कोर्स उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी उमेदवाराकडे शासन मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. ( शारीरिक शिक्षण या विषयामध्ये पदवी मिळवलेली असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ) त्याचबरोबर उमेदवारांनी MS-CIT हा कोर्स मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी 120 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी लघुलेखन आणि 120 शब्द प्रतिमिनिट मराठी लघुलेखन परीक्षा शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराचे इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट असावे आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असावे. आणि उमेदवारांनी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून एमएससीआयटी कोर्स उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. उच्च श्रेणी लघुलेखक ( मराठी ) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळ यांची इंग्रजी 100 शब्द प्रतिमिनिट लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असावी. जर उमेदवाराचे इंग्रजी आणि मराठी 100 शब्द प्रतिमिनिट लघुलेखन असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराचे इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- लघुटंकलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा लघु लेखनाचा वेग 80 शब्द प्रतिनिधी असावा. तर इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रतिमिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असल्याचे शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- उच्चश्रेणी लघुलेखक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता दरमहा 44,900 ते 1,42,400 रुपये वेतन असणार आहे.
- गृहपाल / अधिक्षक ( महिला ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन असणार आहे.
- गृहपाल / अधिक्षक ( सर्वसाधारण ) या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन असणार आहे.
- वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन असणार आहे.
- निम्नश्रेणी लघुलेखक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 41,800 ते 1,32,300 रुपये वेतन मिळणार आहे.
- समाज कल्याण निरीक्षक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 35,400 ते 1,24,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- लघु टंकलेखक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 25,500 ते 81,100 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 1000 रुपये असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 900 रुपये असणार आहे.
- सदरील Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- समाज कल्याण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरती भरती मधील पदांकरिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- समाज कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
- समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा शैक्षणिक तपशील, बायोडाटा मधील सर्व माहिती, कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सत्य सादर करायची आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- 11 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही.
- समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील माहिती वाचा.
- समाज कल्याण विभाग, पुणे येथील Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवार पात्र असतील.
- समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून TA/ DA देण्यात येणार नाही.
- समाज कल्याण विभाग, पुणे येथील Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 भरतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांनी नियमाचे पालन करायचे आहे. कोणत्याही उमेदवाराने सदरील भरती प्रक्रिये दरम्यान अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- परीक्षेला येताना उमेदवारांनी हॉल तिकीट सोबत घेऊन येणे गरजेचे आहे. अन्यथा त्या उमेदवाराला परीक्षा केंद्रावर बसून देता येणार नाही.
- मुलाखतीला येणाऱ्या सर्व उमेदवारांनी फॉर्मल कपड्यांमध्ये येणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख लवकरच उमेदवाराला कळविण्यात येईल.
- 10 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 11 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. कारण ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- सदरील Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि संकेतस्थळाला भेट द्यावी.