TIFR Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून ‘ वैद्यकीय अधिकारी ( डी ), अर्धवेळ मानसशास्त्र, प्रकल्प परिचारिका ( ए ), प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक ( बी ), प्रकल्प लिपिक ( ए)” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 8 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी देण्यात आलेली अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरच्या होणाऱ्या भरती मधून एकूण पाच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरती अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख वाचावा.
- 05 रिक्त जागांकरिता टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथील होणाऱ्या भरती मधून ‘ वैद्यकीय अधिकारी ( डी ), अर्धवेळ मानसशास्त्र, प्रकल्प परिचारिका ( ए ), प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक ( बी ), प्रकल्प लिपिक ( ए)” या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे विविध पदांसाठी भरती.
TIFR Mumbai Bharti 2024 | टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथील पद भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे.
- वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MCI मान्यताप्राप्त विद्यापीठातून जनरल मेडिसिन शाखेची MD पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. हा अनुभव उमेदवाराने नोंदणीकृत हॉस्पिटल मधून घेतलेला असणे गरजेचे आहे. किंवा सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीबीएस पदवी 60% गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवाराकडे नोंदणीकृत हॉस्पिटल किंवा क्लिनिक मध्ये काम केल्याचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी केलेली इंटर्नशिप अनुभवामध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्धवेळ मानसशास्त्र या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सायकॉलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायकॉलॉजी मध्ये पीएचडी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सायकॉलॉजिस्ट म्हणून काम केल्याचा तीन वर्षाचा अनुभव असेल तर अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. ज्या उमेदवाराकडे RCI लायसन असेल आशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- परिचारिका या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पूर्णवेळ अभ्यासक्रमातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नरसिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाने पूर्ण केलेला असावा. आणि उमेदवारांनी ‘A’ ग्रेड नर्स म्हणून रजिस्ट्रेशन केलेले असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हॉस्पिटलमध्ये काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे कॉम्प्युटर आणि एप्लीकेशन संदर्भात ज्ञान असणे गरजेचे आहे.
- प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पूर्णवेळ अभ्यासक्रमातून लॅब बायोलॉजी सायन्स किंवा बायो टेक्नॉलॉजी किंवा लॅब टेक्नॉलॉजी या शाखांमधून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उत्तीर्ण केलेली पदवी कमीत कमी 60% गुण ने उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हिस्टोलॉजी, हिस्टो केमिस्ट्री, टिशू प्रोसेसिंग या कामाचा एक वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- प्रकल्प लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेमधून पूर्णवेळ अभ्यासक्रमातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असावा त्याचबरोबर उमेदवाराकडे टायपिंगचे ज्ञान असावे.
- सदरील TIFR Mumbai Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 40 वर्षापर्यंत असावे. भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हैदराबाद असणार आहे.
- TIFR Mumbai Bharti 2024 या भरती करिता उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ‘ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, सर्वे नंबर 36/ पी, गोपन पल्ली व्हिलेज, सेरीलिंगमपल्ली मंडल, रंगारेड्डी जिल्हा हैदराबाद- 500046″ या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- TIFR Mumbai Bharti 2024 या भरती करिता उमेदवार ऑनलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
TIFR Mumbai Bharti 2024 | टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरती करिता इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
- टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरती करिता कोणत्याही उमेदवाराला ई-मेल द्वारे अर्ज करण्याची सुविधा संस्थे कडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थेच्या ईमेल आयडी वरती कोणत्याही उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे नाहीत.
- भरती करिता अर्ज करत असताना कोणत्याही उमेदवाराने अर्जामध्ये चुकीची माहिती लिहू नये. चुकीची माहिती लिहून संस्थेला फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- 8 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीद्वारे स्वीकारण्यात येणार नाहीत.
- टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्या करून देण्यात आलेल्या पीडीएफ जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करावी.
TIFR Mumbai Bharti 2024 | टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सदरील भरती करिता ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने ज्या उमेदवारांचे अर्ज अर्ज करायच्या अंतिम दिनांक पूर्वी संस्थेत कडे पोहोचलेले आहेत आशा उमेदवारांनाच पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. इतर कोणत्याही उमेदवारांना भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार नाही.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
- सदरील होणाऱ्या TIFR Mumbai Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार केला गेला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
TIFR Mumbai Bharti 2024 | टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरती संदर्भात महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
- टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील TIFR Mumbai Bharti 2024 भरतीसाठी अधिक माहिती खालील प्रमाणे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना TIFR हैदराबाद या ठिकाणी काम असणार आहे.
- भरती मधील देण्यात पद क्रमांक एक वरती असलेल्या उमेदवाराला टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्या इतर शाखांमध्ये सुद्धा काम करायला लागणार आहे.
- भरतीसाठी पात्र असणाऱ्या पद क्रमांक एकच्या लायक उमेदवारांकरिता फक्त सुरुवातीला जास्त पगार देता येणार आहे.
- पद क्रमांक 2, 3, 4 & 5 पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांची नोकरी तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. यांना दरवर्षी नोकरीचा कालावधी रिन्यू करावा लागणार आहे. नोकरीचा एकूण कालावधी तीन वर्षांकरिता असणार आहे. उमेदवाराच्या कामानुसार त्याचे कालावधी वाढवण्यात येणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना शनिवारी आणि रविवारी सुद्धा ऑफिसच्या बाहेरून संस्थेसाठी काम करावे लागणार आहे.
- या भरतीसाठी आवश्यक वय मर्यादा 1 जुलै 2024 पासून मोजण्यात येणार आहे.
- खुल्या प्रवर्गातील आणि राखीव प्रवर्गातील अशा दोन्ही प्रवर्गातील उमेदवारांना सदरील भरती करिता अर्ज करता येणार आहेत.